पुणेकरांना दिलासा! पीएमपीच्या ताफ्यात लवकरच 400 सीएनजी बस दाखल होणार, सर्व प्रक्रिया पूर्ण…

पुणे : गेल्या काही वर्षांपासून पुणे शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता पीएमपीच्या ताफ्यात फेब्रुवारी महिन्यापासून भाडेतत्वावरील 400 सीएनजी बस दाखल होण्यास सुरुवात होणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यामुळे रोजच्या गर्दीतून होणार्या प्रवासाची कटकट आणि बससाठी होणारे वेटींग काही प्रमाणात का होईना, कमी होणार आहे. याबाबत आवश्यक त्या सर्व बाबींची तपासणी पीएमपीच्या वरिष्ठ अधिकार्यांकडून करण्यात आली आहे. यामुळे पुणेकरांना दिलासा मिळणार आहे.
सध्या पीएमपीच्या ताफ्यात सध्या 1 हजार 880 बस आहेत. त्यापैकी 1 हजार 568 बस दररोज मार्गावर प्रवासी सेवा पुरवतात. पीएमपीच्या ताफ्यात येणार्या भाडेतत्त्वावरील या चारशे बसपैकी 121 बस अशोक लेलँडच्या तर 279 टाटाच्या असणार आहेत.
पुर्वी पीएमपीच्या ताफ्यातील बससंख्या 2 हजारपेक्षा अधिक होती. मात्र, आयुर्मान संपलेल्या बस स्क्रॅप केल्यामुळे बस गाड्यांची संख्या कमी झाली आहे. यामुळे नवीन बस दाखल करण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. आता याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या बसची संख्या कमी झाली. मात्र, प्रवाशांची संख्या वाढतच आहे. परिणामी, बससाठी वेटींग आणि गर्दीतील जीवघेणा प्रवास, आणि गर्दीचा फायदा घेत होणार्या चोर्यांचा त्रास पीएमपी बस प्रवाशांसाठी रोजचाच झाला आहे. यामुळे याबाबत आता काहीसा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, पुणे शहराची लोकसंख्या पाहाता आवश्यक बससंख्या पीएमपीकडे नाही. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. सध्याच्या घडीला पुणेकरांसाठी पीएमपीच्या ताफ्यात 3 हजारपेक्षा अधिक बस असणे आवश्यक आहे. यानुसार पीएमपी प्रशासनाकडून नियोजन सुरू आहे. यातून वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.