शरद पवारांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी पडळकरांना दिलासा! बारामती सत्र न्यायालयाचा महत्वाचा निर्णय…


बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या खटल्यातून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची मुक्तता करण्यात आली आहे. बारामतीचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. पी. पुजारी यांनी याबाबत आदेश दिले आहेत पडळकर यांनी शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेला कोरोना असे वादग्रस्त विधान केले होते.

यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. यामुळे पडळकरांवर राज्यभरातून टीका केली गेली. याबाबत राष्ट्रवादीचे अमर धुमाळ यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात पडळकर यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली होती. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक मुकुंद पालवे यांनी या प्रकरणाचा तपास केला.

नंतर पडळकर यांच्या विरोधात बारामती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. नंतर वारंवार समन्स बजावून देखील पडळकर हे न्यायालयात हजर झाले नाहीत. नंतर त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले. या खटल्यात चार साक्षीदार तपासण्यात आले. आज पडळकर याठिकाणी हजर होते.

गुन्हा दाखल केला ते त्यांच्यासाठी तो लागूच होत नसल्याचा युक्तिवाद पडळकर यांच्या वकीलांनी केला. हे कलम लावणे गैरलागू आहे. त्यांचे विधान व्यक्तिशः होते. समुदायाला अनुसरून नव्हते, असा युक्तिवाद करण्यात आला.

यानंतर आज न्यायालयाने तो ग्राह्य धरत पडळकर यांची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणी माझ्या विरोधात बारामती न्यायालयात खटला सुरु होता. त्यात माझी निर्दोष मुक्तता केली आहे, असे आज गोपीचंद पडळकर यांनी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!