LPG ग्राहकांना महिन्याच्या सुरूवातीला दिलासा! गॅस सिलिंडर झाला स्वस्त, जाणून घ्या नवे दर..

नवी दिल्ली : ग्राहकांसाठी ऑगस्ट महिन्याची सुरुवात दिलासादायक ठरणार आहे. देशभरातील व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत सलग पाचव्या महिन्यात कपात झाली आहे. यंदाच्या महिन्यात सुमारे ₹३४ रुपयांची घट झाली असून, यामुळे हॉटेल्स, कॅन्टीन, व्यवसायिक वापरकर्त्यांना मोठा फायदा होणार आहे.
दरम्यान, मार्च २०२५ पासून व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत सातत्याने घट होत असून, आतापर्यंत एकूण ₹१७० रुपयांची कपात झाली आहे. जागतिक बाजारातील नैसर्गिक गॅसच्या किंमती कमी झाल्याचा थेट परिणाम देशांतर्गत दरांवर दिसून आला आहे. मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत अद्याप कोणताही बदल झालेला नाही.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड) च्या आकडेवारीनुसार, चार महानगरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर खालीलप्रमाणे आहेत:
दिल्ली – ₹1631.50 (कपात ₹33.50)
मुंबई – ₹1582.50 (कपात ₹34)
कोलकाता – ₹1734.50 (कपात ₹34.50)
चेन्नई – ₹1789.00 (कपात ₹34.50)
एप्रिल महिन्यात मोदी सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ₹50 ची वाढ केली होती. त्यानंतर ते दर जसाच्या तसा कायम आहेत..
दिल्ली – ₹853 मुंबई – ₹852.50 कोलकाता – ₹879 चेन्नई – ₹868.50