नात्याला काळिमा! पाण्यात औषध टाकून 50 वर्षीय चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार, बीड हादरलं…


बीड : राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

एका 50 वर्षीय नराधमाने आपल्या नात्यातील 19 वर्षीय पुतणीवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील युसुफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

रक्ताच्या नात्याला आणि विश्वासाला तडा देणारी एक अत्यंत घृणास्पद घटना केज तालुक्यातील युसुफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, 50 वर्षीय चुलत्यावर आपल्या 19 वर्षीय चुलत पुतणीला पाण्यातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे, तर हे कृत्य कोणास सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही या नराधमाने दिली होती.

या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत. हा प्रकार साधारण पाच महिन्यांपूर्वी घडला होता. आरोपीने पीडितेच्या पिण्याच्या पाण्यात गुंगीचे औषध मिसळून तिला बेशुद्ध केले आणि तिच्यावर पाशवी अत्याचार केला.

यानंतर या कृत्याची वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याने पीडित तरुणी प्रचंड दहशतीखाली होती. या घटनेनंतर काही दिवसांतच पीडितेचा विवाह झाला आणि ती सासरी निघून गेली.

पंधरा-वीस दिवसांपूर्वीच विवाह झालेली ही तरुणी तीन दिवसांपूर्वी माहेरी आली होती. तिथे तिला झालेल्या त्रासाबद्दल तिने आपल्या कुटुंबातील सदस्यांना विश्वासात घेऊन सर्व हकीगत सांगितली. आपल्याच नात्यातील व्यक्तीने केलेले हे नीच कृत्य ऐकून कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली, त्यानंतर त्यांनी युसुफ वडगाव पोलीस ठाणे गाठले.

पीडितेच्या तक्रारीवरून शनिवारी रात्री उशिरा युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात संबंधित 50 वर्षीय चुलत्याविरुद्ध अत्याचार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच आरोपी फरार झाला असून पोलिसांची पथके त्याच्या मागावर आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!