सतीश वाघ यांच्या खुनापूर्वी जादूटोणा अन् रेकी, आरोपपत्रातून धक्कादायक माहिती आली समोर..

पुणे: गेल्या काही महिन्यांपूर्वी आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या खुनामुळे एकच खळबळ उडाली होती. याबाबत मुख्य सूत्रधार हा अक्षय जावळकर, त्याला भरीस घालणारी ही मोहिनी वाघच असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली होती.
आता सतीश यांचा काटा काढण्यासाठी जादूटोण्याचा प्रयोग केल्याचा धक्कादायक प्रकार आरोपपत्रातून समोर आला आहे. याबाबत लष्कर न्यायालयात नुकतेच एक हजार पानांचे दोषारोपपत्र गुन्हे शाखेकडून दाखल करण्यात आले. अक्षय आणि मोहिनीसह अतिश जाधव, पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे आणि विकास शिंदे या सहा जणांवर आरोपपत्र दाखल झाले आहे. यामध्ये धक्क्कादायक माहिती समोर आली होती.
सतीश वाघ यांचा 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करून वार करून खून करण्यात आला. त्यानंतर त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात फेकून देण्यात आला. नंतर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य पाहता हा तपास पुढे हडपसर पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. या खून प्रकरणात रोज धक्कादायक माहिती समोर येत होती.
याबाबत पाच लाख रुपयांना ही सुपारी देण्यात आली. या सुपारीतील एकही रुपया मोहिनी हिने दिला नाही. अक्षय याने दीड लाख रुपये सुरुवातीला शर्मा याच्या बँक खात्यावर पाठवले. शर्मा आणि त्याच्या साथीदारांनी सतीश यांचा खून केल्यानंतर त्याच दिवशी अक्षय याने राहिलेले तीन लाख रुपये शर्माला त्याच्या वाघोली येथील घरी नेऊन दिले.
अक्षय आणि मोहिनी या दोघांनी मिळून सतीश यांचा पाच लाख रुपयांत सुपारी देऊन खून घडवून आणल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. सतीश यांचा पाय तोडून त्यांना एक तर जागेवर बसवायचे किंवा त्यांचा खून करून वाटेतून कायमचे दूर करायचे होते. एकदा का सतीश यांचा बंदोबस्त झाला, की हॉटेल आणि खोल्यांचे भाडे, त्यातून मिळणारे सर्व उत्पन्न, मोहिनी हिच्या हातात येणार होते. असा त्यांचा प्लॅन होता.