शरीरसंबंधास नकार अन्…. बेवारस महिलेच्या खुनाचे गुढ अखेर समोर, आरोपीला बेड्या, गुन्हे शाखा युनिट ६ ची धडाकेबाज कारवाई

लोणी काळभोर : महिलेसोबत जबरदस्तीने शरीरसंबध करण्याच्या प्रयत्न केला असता तिने प्रतिकार केल्याने त्याचा राग मनात ठेवुन महिलेचा गळा दाबुन, डोक्यात दगड घालुन खुन केल्याप्रकरणी शाखा युनिट ६ पथकाने एकास अटक केली आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ३ मार्च रोजी हडपसर-सासवड रोड लगत दिवे घट पायथ्याशी काची कंपनी शेजारील मोकळया जागेत वडकी या ठिकाणी एका ३० ते ४० वर्षे वयोगटातील अनोळखी महिलेचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह मिळुन आलेला होता. त्या सबंधाने फुरसुंगी पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्हयाचा वरिष्ठांचे सुचना व मार्गदर्शनाखाली गुन्हयामधील अज्ञात आरोपींचा गुन्हे शाखा युनिट ६ पथकाडुन शोध सुरु असताना पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांचे सुचनाप्रमाणे अज्ञात आरोपीचा तपास करीत असताना पोलीस अंमलदार अमित कांबळे व तानाजी देशमुख यांच्यासह युनिट ६ कडील पोलीस स्टाफने नमुद गुन्हयाचा बारकाईने तपास करुन एका सीसीटीव्ही.फुटेजच्या आधारे गुन्हयाचा उलगडा करुन आरोपी प्रकाश बिभीषन माने, (वय २९, रा. समीर आंबेकर यांच्याकडे भाडयाने, वडकी नाला, ता. हवेली जि पुणे.) यास ताब्यात घेवुन त्यास सखोल विचारपुस केली असता, आरोपीने मयत महिलेसोबत जबरदस्तीने शरीरसंबध करण्याच्या प्रयत्न केला असता मयत महिलेने प्रतिकार केल्याने त्याचा राग मनात ठेवुन महिलेचा गळा दाबुन, डोक्यात दगड घालुन खुन केला अशी कबुली दिली आहे. सदर महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाप्रमाणे युनिट ६ गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांचे सुचनांप्रमाणे पोलीस अंमलदार तानाजी देशमुख, प्रमोद टिळेकर, प्रशांत कर्णवर, बाळासाहेब सकटे, अमित कांबळे, गणेश माने, शेखर काटे, नानासाहेब मोरे व अनिल जामगे तसेच महिला पोलीस अंमलदार पल्लवी मोरे यांनी केली आहे.