रीलस्टारकडे शरीर सुखाची मागणी; एकावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…


लोणी काळभोर : एका प्रसिद्ध रीलस्टारकडे शरीर सुखाची मागणी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ३७ वर्षिय पिडीत रीलस्टारने दिलेल्या फिर्यादीवरून कानिफनाथ सुदाम जगदाळे (वय ३९, रा. माळी मळा, लोणी काळभोर ता. हवेली जि. पुणे) याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भातील सविस्तर माहिती अशी की पीडिता या प्रसिद्ध ‘रीलस्टार’ असून त्या आपल्या कुटुंबासोबत पुणे जिल्ह्यातील एका गावात कुटुंबासोबत राहतात. नवरात्रोत्सवांत लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा परिसरांत हास्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पीडिता या पती व मुलांसोबत आयोजित करण्यात आलेल्या एका फनि गेमच्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या. कार्यक्रम पाहत असताना, कानिफनाथ जगदाळे तेथे आला. त्यांवेळी त्याने तुमचेकडे काम आहे. कसे कारण सांगून तिला एका बाजूला बोलाविले. व “माझं तुझ्यावर प्रेम आहे, तु मला आवडतेस, तु माझ्या सोबत एक रात्र झोप” असे म्हणून पीडिता यांच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल. असे गैरवर्तन केले.

सदर बाब तिच्या पतीला समजताच त्याने याबाबत जाब विचारताच जगदाळे याने ‘मी तुझ्या पत्नीला बोललो आहे तुला काय करायचे आहे ते कर, तु जास्त बोलला तर तुझे हातपाय काढून टाकीन अशी धमकी दिली.

पिडीत रीलस्टारने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यांवरून कानिफनाथ जगदाळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पूजा माळी करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!