सावधान ! हवामान खात्याने दिला नवीन रेड अलर्ट , पुणे , मुंबई सह काही जिल्ह्यात अतिवृष्ठी ….
मुंबई : हवामान खात्याने आता सुधारीत अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार पुणे आणि सातारा घाटमाथ्याला आज रेड अलर्ट असून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.
बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात मोसमी वारे वाहत असून त्याचा वेग वाढल्याने राज्यात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे मोसमी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे.
यापूर्वी हवामान खात्याने 24 ऑगस्टपर्यंत दिलेला मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविली होती. आता हा पावसाचा अंदाज पुन्हा वाढला असून, आज देखील पुणे व सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी होऊ शकते.
दुसरीकडे उर्वरित राज्यामध्ये ऑरेंज अलर्ट असून मराठवाडा वगळता येत्या गुरुवारपर्यंत राज्यातील इतर भागात पावसाचा जोर वाढू शकतो. शुक्रवारपासून सक्रिय झालेल्या मोसमी पावसाने आता राज्यातील इतर भागातही जोर पकडला असून रविवारी 25 ऑगस्ट साठी वरील सहा जिल्ह्याव्यतिरिक्त रत्नागिरी, नाशिक, धुळे, नगर, ठाणे, नंदुरबार, अकोला, वर्धा यवतमाळ, वाशिम, भंडारा, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.