पुणे महापालिकेत जॉबची मोठी संधी! ग्रॅज्युएट आणि टायपिंग वाल्यांसाठी भरती प्रक्रिया सुरू…

पुणे : पुणे महानगरपालिका इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. लिपिक कम डेटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख २७ जुन २०२३ असणार आहे.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव…
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवी परीक्षा उत्तीर्ण केली असणे आवश्यक आहे.

तसंच वयाची १८ वर्षे पूर्ण केली असणे आवश्यक आहेत.
उमेदवारांची ४० W.P.M च्या गतीसाठी टायपिंगची सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाली असणे आवश्यक आहे.
तसेच मराठीत ३० W.P.M टायपिंगची सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाली असणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक असणार आहे.
या जागांसाठी भरती
लिपिक कम डेटा एंट्री ऑपरेटर
एकूण जागा – ०६
ही कागदपत्रं आवश्यक…
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – २७ जुन २०२३
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.pmc.gov.in/landing/mar.html या लिंकवर क्लिक करा.