मुंबई महानगरपालिकेत ‘या ‘पदांसाठी भरती; दरमहा मिळणार 25000 रुपये पगार


मुंबई : मुंबईत नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे.मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत येणाऱ्या क्षयरोग रुग्णालय समूहाने विविध पदांसाठी पदभरती जाहीर केली आहे. यामध्ये एकूण पाच पदे भरली जाणार आहेत ही पदे कॉन्टॅक्ट पद्धतीने भरली जाणार असून फार्मासिस्ट म्हणजेच औषध निर्माता आणि सोशल डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणजेच समाज विकास अधिकारी या दोन पदांच्या रिक्त जागा या पदभरतीतून भरल्या जाणार आहेत. या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना मुंबईत काम करावे लागणार आहे.

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

सोशल डेव्हलपमेंट ऑफिसर पदासाठी समाज विद्यापीठाची वैद्यकीय विषयातील पदवी किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ‘Master in Social Work in Genetic’ मध्ये पदवी घेतलेला उमेदवार पात्र ठरणार आहे.

       

फार्मासिस्टसाठी तंत्रशिक्षण मंडळाची फार्मसीमधील पदवी/

मान्यताप्राप्त विद्यापीठाची फार्मसी पदवीधारक उमेदवार पात्र राहील. या दोन्ही पदांसाठी 17 – 38 वर्ष वयोगटातील उमेदवार पात्र असतील.

किती पगार मिळणार

या पदभरती अंतर्गत कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने उमेदवारांना रुजू केले जाणार आहे. या भरती अंतर्गत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना मासिक 20 ते 25 हजार रुपयांचे वेतन मिळणार आहे.

अर्ज कुठे करावा लागणार ?.

पदभरती साठी इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वैद्यकीय अधीक्षक, क्षयरोग रुग्णालय समूह, जेरबाई वाडिया रोड, शिवडी, मुंबई 400015 या पत्त्यावर इच्छुक अन पात्र उमेदवारांना अर्ज करावा लागणार आहे.उमेदवारांना 12 सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे मुदत संपल्यानंतर कोणत्याही अर्जाचा विचार केला जाणार नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!