पुण्यातील इंजिनिअरिंग कॉलेजवर १० वर्षांच्या बंदीची शिफारस!! शिक्षण क्षेत्रात उडाली खळबळ..


पुणे : पुणे जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारी एक बातमी समोर आली आहे. वाघोली येथील ‘पार्वतीबाई गेनबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’ मध्ये उघडकीस आलेल्या परीक्षा गैरप्रकारामुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाईसाठी शिफारशी केली आहे.

या कॉलेजवर १० वर्षांची बंदी येण्याची शक्यता आहे. यामुळे याची जोरदार चर्चा सुरु आहे. याठिकाणी काही प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी पैशांच्या मोबदल्यात विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका परत देऊन नव्याने उत्तरं लिहायला लावली. विद्यार्थ्यांकडून परीक्षा संपल्यानंतर रात्रीच्या अंधारात पुन्हा उत्तरपत्रिका लिहून घेतल्याचा आरोप या कॉलेजवर झाला आहे.

यामुळे याप्रकरणी सध्या तपास सुरु आहे. विद्यापीठाने स्पष्ट केलं आहे की संस्थेमध्ये पूर्णवेळ प्राचार्य आणि पात्र प्राध्यापकांची नेमणूक आवश्यक आहे, जेणेकरून अशा घटना पुन्हा घडू नयेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने याची गंभीर दखल घेत तत्काळ एक चौकशी समिती नेमली. या समितीचे नेतृत्व देविदास वायदंडे यांनी केलं आहे.

दरम्यान, या समितीने संबंधित कॉलेजला भेट देत सखोल तपास करून विद्यापीठ प्रशासनाला अहवाल सादर केला. आता या प्रकारामुळे फक्त एक संस्थाच नव्हे, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित राहावे यासाठी विद्यापीठाच्या धोरणात्मक कृतीची सर्वत्र नोंद घेतली जात आहे.

दरम्यान, हा निर्णय केवळ एका कॉलेजपुरता मर्यादित राहणार नसून, इतर संस्थांसाठीही चेतावणी ठरणार आहे. आता कॉलेजचं परीक्षा केंद्र पुढील १० वर्षांसाठी बंद ठेवावं, संस्थेला ३ लाखांचा आर्थिक दंड ठोठवावा, दोषी प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ३ वर्ष परीक्षा कामांपासून दूर ठेवावं, अशा शिफारशी अहवालात करण्यात आल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!