Recharge : निवडणूकीच्या निकालानंतर तुमचा खिसा होणार रिकामा, मोबाईलचा रिचार्ज वाढवणार तुमचा खर्च, जाणून घ्या….


Recharge : लोकसभेच्या निवडणुकीनंतर मोबाईल वापरकर्त्यांना झटका बसणार आहे. कारण मोबाईलचा रिचार्ज ५० ते २५० रुपयांनी महागणार आहे. टेलीकॉम कंपन्यांनी त्यांचा महसूल वाढवण्यासाठी लोकसभा निवडणुकीनंतर टॅरिफ योजना वाढवू शकतात.

ही वाढ साधारण २५ रुपयापर्यंतची असू शकते. विशेष म्हणजे २०१९ ते २०२३ पर्यंत कंपन्यांनी त्यांच्या टॅरिफ प्लॅनमध्ये 3 पट वाढ केली आहे. त्यामुळं लोकसभा निवडणुकीत मोबाईलचा वापर करणाऱ्यांना मोठा धक्का बसू शकतो.

टेलिकॉम कंपन्या मोबाईलचे दर वाढवण्याच्या तयारीत असून, ही वाढ २५ टक्क्यांपर्यंत दिसू शकते. मोबाईल रिचार्जमध्ये वाढ होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे प्रति यूजर रेव्हेन्यूमध्ये वाढ. तज्ञांच्या मते, सध्या टेलिकॉम कंपन्यांचा प्रति वापरकर्ता सरासरी महसूल खूपच कमी आहे. Recharge

याचा अर्थ प्रत्येक वापरकर्त्यावर मोबाइल कंपन्या किती खर्च करत आहेत. ते इतके कमावत नाहीत. या कारणास्तव, टेलिकॉम कंपन्या त्यांच्या टॅरिफ प्लॅनमध्ये २५ टक्क्यांनी वाढ करू शकतात. आता जर २५ टक्के दरवाढ झाली, तर सर्वसामान्यांच्या खिशावर किती परिणाम होईल, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

तुम्ही दर महिन्याला २०० रुपयांचे रिचार्ज केल्यास ते ५० रुपयांनी वाढेल. याचा अर्थ २०० रुपयांचा टॅरिफ प्लॅन २५० रुपयांना मिळेल. दुसरीकडे, जर तुम्ही ५०० रुपयांचे रिचार्ज केले तर ते २५ टक्क्यांनी १२५ रुपयांनी वाढेल. जर तुम्ही १००० रुपयांचा रिचार्ज केला तर त्याचे मूल्य २५० रुपयांनी वाढेल आणि एकूण टॅरिफ किंमत १२५० रुपये होईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!