RBI चा मोठ्या बडया बँकेंला दणका ; थेट परवानाच रद्द, हजारो ठेवीदारांचे पैसे अडकून…


पुणे : भारताची मध्यवर्ती बँक भारतीय रिझर्व्ह बँक संबंधित बँकेवर कठोर निर्बंध लादते. कधी-कधी बँकेचा परवानाही रद्द केला जातो. अशातच आता आरबीआयने एका मोठ्या बँकेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सध्या रिझर्व्ह बँकेने सातारा जिल्ह्यातील जिजामाता महिला सहकारी बँकेवरही अशाच प्रकारची कारवाई केली आहे. आरबीआयने या भँकेचा परवाना रद्द केल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

आरबीआयने घेतलेल्या या निर्णयाचे मुख्य कारण म्हणजे बँकेकडे आवश्यक तेवढी भांडवली रक्कम नसणे आणि बँकेची कमाईची स्थिती समाधानकारक नसणे असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता आरबीआयने बँकेचा परवाना रद्द करत 7 ऑक्टोबर 2025 पासून जिजामाता महिला सहकारी बँकेला बँकिंग व्यवसाय बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. म्हणजेच आता ही बँक ठेवी स्वीकारू शकत नाही किंवा परतफेड करू शकत नाही. आरबीआयने महाराष्ट्रातील राज्य सहकार आयुक्तांना विनंती केली आहे की, या बँकेच्या लिक्विडेशनची प्रक्रिया सुरू करून त्यासाठी लिक्विडेटर नेमावा. ठेवीदारांचे संरक्षण आरबीआयच्या निवेदनानुसार, परवाना रद्द झाल्यानंतर प्रत्येक ठेवीदाराला त्याच्या ठेवींपैकी जास्तीत जास्त 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम ठेव विमा आणि पत हमी महामंडळ मार्फत मिळणार आहे. दरम्यान दिवाळीच्या तोंडावर घेतलेल्या या निर्णयामुळे जिजामाता बँकेच्या ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

भारतीय रिझर्व बँकेने यापूर्वी बँकेतील झालेल्या भ्रष्टाचारामुळे 30 जून 2016 रोजी जिजामाता महिला सहकारी बँकेचा परवाना रद्द केला होता. परंतु बँकेने केलेल्या अपीलनंतर 23 ऑक्टोबर 2019 रोजी परवाना पुन्हा बहाल करण्यात आला होता.त्यानंतर पुन्हा एकदा आता या बँकेचा परवाना रद्द केला आहे. त्यामुळे हजारो ठेवीदारांचे पैसे अडकून असल्याने त्यांनाही मोठा धक्का बसला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!