RBI Repo Rate : यंदाच्या आर्थिक वर्षात विकासदर कसा राहणार? RBI ने दिली महत्वाची माहिती, जाणून घ्या…
RBI Repo Rate : रिझर्व्ह बँकेकडून यंदाच्या आर्थिक वर्षातलं पहिले पतधोरण जाहीर झालं आहे. यामध्ये यंदा देखील रेपो रेटमध्ये कोणताही बदल झालेला नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा ग्राहक, कर्जदारांची घोर निराशा केली.
त्यांना रेपो दरात कपात होऊन कर्जावरील हप्ता कमी होण्याची आशा होती. पण वाढलेल्या महागाईने या मनसुब्यावर पाणी फेरले गेले. नवीन आर्थिक वर्षात ही रेपो दरात काहीच बदल न करुन आरबीआयने सप्तपदी पूर्ण केली.
रेपो दर गेल्या एक वर्षांपासून जैसे थे आहे. पतधोरण समितीच्या बैठकीनंतर ५ एप्रिल रोजी हा निर्णय जाहीर झाला. गेल्या सहा वेळा रेपो दर जैसे थे ठेवण्याची कामगिरी आरबीआयने केली होती. सातव्यांदा हा दर जैसे राहण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्ता केला होता. RBI Repo Rate
अमेरिकन केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने व्याज दर कपातीचे संकेत दिल्याने, त्याचा दबाव पण आरबीआयवर असण्याची दाट शक्यता होती. त्यातच लोकसभा निवडणूक २०२४ मुळे रेपो दरात कपात होण्याची शक्यता होती, पण हा अंदाज चुकला. सध्या रेपो दर हा ६.५ टक्के असाच आहे. त्यात कुठलाही बदल न करण्याचे धोरण आरबीआयच्या पतधोरण समितीने जाहीर केले आहे.