Ravikant Tupkar : शेतकरी नेते रविकांत तुपकर मातोश्रीवर, राजकीय घडामोडींना वेग…
Ravikant Tupkar : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. पण सध्या सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी थेट लढत होणार आहे. सध्या या दोन्ही घटक पक्षांच्या बैठका पार पडताना दिसत आहेत.
अशातच आता राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी होण्याची शक्यता आहे. कारण शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरेंची आज भेट घेतली आहे.
तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविकांत तुपकर यांच्यासोबत उद्धव ठाकरेंनी चर्चा केली असून या भेटीला वेगळे महत्त्व असल्याचे बोलले जात आहे.
बुलडाणा विधानसभा मतदारसंघात रविकांत तुपकर यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. तर आगामी काळात रविकांत तुपकर हे महाराष्ट्र दौरा करत असून जवळपास २५ जागांवर उमेदवार देण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे. Ravikant Tupkar
लोकसभेला बुलडाणा मतदारसंघातून रविकांत तुपकर हे अपक्ष म्हणून उभे राहिले होते. यावेळी त्यांचा निवडणुकीत पराभव जरी झाला असला तरी त्यांनी जवळपास अडीच लाख मते घेतली होती.
त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मत विभाजन आणि नुकसान टाळण्यासाठी रविकांत तुपकर यांना सोबत घेण्याच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीत सकारात्मक चर्चा होत असल्याची माहिती आहे.