Ravikant Tupkar Health : मोठी बातमी! शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात उपचार सुरू..


Ravikant Tupkar Health : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं मागे घेतलं. राज्य सरकार सोबत झालेल्या सकारात्मक बैठकीनंतर तुपकरांनी बुधवारी आंदोलन मागे घेतले. 

कर्जत येथे सोबत आलेल्या हजारो शेतकऱ्यांच्या साक्षीने त्यांनी महिलांच्या हातून दोन चमचे खिचडी देखील खाल्ली. दरम्यान, अन्नत्याग आंदोलनामुळे रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावली आहे. Ravikant Tupkar Health

रविकांत तुपकर यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रविकांत तुपकर लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते करत आहेत.

रविकांत तुपकर यांचा ब्लड प्रेशर आणि शुगर लेव्हल कमी झाली आहे, याशिवाय त्यांच्या किडनीवरही परिणाम झाल्याची माहिती आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यात आंदोलन सुरू केले होते.

अचानक अस्वस्थ जाणवू लागल्याने तुपकर यांना मुंबईतील (चर्नी रोड) सैफी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असून तुपकर लवकरात लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!