भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली क्लीट ; सर्व फॉरमॅट मधून निवृत्ती जाहीर …


Ravichandran ashwin : भारताचा महान फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. गाबा कसोटीनंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. अश्विन कर्णधार रोहित शर्मासोबत पत्रकार परिषदेत पोहोचला होता आणि तेथे त्याने ही घोषणा केली. निवृत्तीपूर्वी अश्विन ड्रेसिंग रूममध्ये विराट कोहलीसोबत बसलेला दिसला होता. यादरम्यान कोहलीने त्याला मिठीही मारली. ॲडलेड डे नाईट टेस्टमध्ये अश्विन टीम इंडियाचा भाग होता.

या 38 वर्षीय फिरकीपटूने भारतासाठी अनेक विक्रम केले आहेत. कसोटीत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो सातव्या क्रमांकावर आहे. अश्विनच्या नावावर 106 कसोटीत 537 विकेट आहेत. 59 धावांत सात बळी ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. या काळात त्याची सरासरी 24.00 होती आणि स्ट्राइक रेट 50.73 होता. कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीयांमध्ये अश्विन हा अनिल कुंबळेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. कुंबळेच्या नावावर 619 कसोटी विकेट्स आहेत. अश्विनची निवृत्तीची घोषणा धक्कादायक आहे, कारण तो भारतीय भूमीवर भारतीय फिरकी आक्रमणाचा प्रमुख होता. ऑस्ट्रेलियात येऊन अचानक निवृत्तीचा निर्णय घेणे धक्कादायक आहे.

अश्विनने कसोटीत 37 वेळा पाच बळी घेतले आहेत, जे भारतीय गोलंदाजामध्ये सर्वाधिक आहे. त्याच्यानंतर कुंबळेची नंबर येतो कुंबळेने कसोटीत 35 वेळा पाच विकेट्स घेतल्या होत्या. एकाच डावात पाच विकेट्स घेण्याचा एकूण विक्रम श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. असे त्याने 67 वेळा असा पराक्रम केला आहे. अश्विन शेन वॉर्नसोबत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे.

तसेच अश्विनने 116 एकदिवसीय सामन्यांमध्ये 156 आणि 65 T-20 मध्ये 72 विकेट घेतल्या आहेत. एक फलंदाज म्हणून अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 3503 धावा केल्या आणि एकूण 6 कसोटी शतके झळकावली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांची एकूण 8 शतके आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Group