रेव्ह पार्टी प्रकरण ; “ऐसा माल चाहिए” खेवलकर यांच्या फोनमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ अन चॅट सापडल्याचा पोलिसांचा खळबळजनक दावा…


पुणे : पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेडकर अटक करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली. खेवलकर यांच्यासह पाच आरोपींची पोलीस कोठडी संपत असल्यामुळे त्यांना पुणे पोलिसांनी शिवाजीनगर कोर्टात हजर केलं.यावेळी पोलिसांनी कोर्टामध्ये प्रांजल खेवलकर यांच्याबद्दल धक्कादायक माहिती दिली. प्रांजल यांनी एका महिलेचा व्हिडीओ नाचताना दुसऱ्या आरोपीला पाठवला होता. त्यात एक मुलगी नाचताना दिसत होती ज्यात म्हटलं की ‘ऐसा माल चाहिए’, प्रांजल खेवलकर यांच्या फोनमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट सापडले, असा दावा पोलिसांनी केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

तपासात असे म्हटले आहे की, प्रांजल खेवलकरांनी एका महिलेचा व्हिडीओ नाचताना दुसऱ्या आरोपीला पाठवला होता. त्यात एक मुलगी नाचताना दिसत आहे ज्यात म्हटलंय की ‘ऐसा माल चाहीए’. यातील महिला आरोपी आणि प्रांजल २ वर्षापासून एकमेकांशी बोलतात. हा अमली पदार्थ यांनी आणला. परंतु कुठून आणला हे सांगत नाहीत. गेली २ वर्ष प्रांजल हे त्या हॉटेलमध्ये येतात पार्टी करतात. राहुल नावाचा अजून एक आरोपी आहे तो फरार आहे. आम्हाला अजून पोलीस कोठडी हवी आहे,प्रांजल यांच्या मोबाईलमध्ये अनेक गोष्टी आक्षेपार्ह गोष्टी मिळाल्या आहेत, व्हिडिओ आहेत त्याबाबत तपास करायचा आहे, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात दिली.

दरम्यान प्रांजल खेवलकर यांच्या पत्नी रोहिणी खडसे या आज पुन्हा वकिली पोशाख घालून न्यायालयात हजर होत्या. यावेळी तपास अधिकाऱ्यांनी ५ ही आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी केली. यावेळी सरकारी वकिलांनी जोरदार युक्तीवाद केला. यावेळी प्रांजल खेवलकर यांच्याबाबतची धक्कादायक माहिती समोर आल्याने या प्रकरणाला आता वेगळ वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!