रेव्ह पार्टी प्रकरण ; खेवलकरांनी ड्रग्ज सेवन केलंच नव्हतं,फॉरेन्सिक रिपोर्टमधून मोठा दिलासा


पुणे: पुण्यातील खराडी भागातील रेव्ह पार्टी प्रकरणामुळे अडचणीत आलेलेराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खेवलकर यांनीं अमली पदार्थांचे सेवन केले नव्हते, असे प्रादेशिक न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या (फॉरेन्सिक) अहवालातून स्पष्ट झाले आहे.

काय आहे प्रकरण?

पुणे पोलिसांनी २७ जुलै रोजी खराडीतील हॉटेलमध्ये छापा टाकला होता. त्या वेळी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली होती. तेथून कोकेन आणि गांजा जप्त केलेला होता. त्याच ठिकाणी २५ जुलैलाही पार्टी झाली होती, असा दावा पोलिसांनी केला होता.अटकेनंतर आरोपींच्या रक्ताचे नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. आता मिळालेल्या अहवालात ड्रग्ज सेवनाचे पुरावे सापडले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी हा अहवाल न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रामध्ये समाविष्ट केला आहे.

प्रांजल खेवलकर यांनी ड्रग्ज प्रकरणात दीड महिन्यांहून अधिक काळ तुरुंगवास भोगला असून सध्या ते जामिनावर आहेत. खेवलकर यांच्या ‘इन्स्टाग्राम चॅट’चा उल्लेखही पोलिसांनी आरोपपत्रात केला आहे. त्यात अमली पदार्थ मागवल्याचे काही मेसेज असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र फॉरेन्सिकच्या अहवालातून खेवलकर यांनी ड्रगचे सेवन केले नसल्याच उघड झाल आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!