रेव्ह पार्टी प्रकरण ; खडसेंच्या कट्टर विरोधकांच प्रांजल खेवलकरांबाबत गंभीर वक्तव्य, वादाला ठिणगी…

पुणे : माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात दररोज खेवलकर यांच्याविरोधात नवनवीन माहिती समोर येत असतानाच आता एकनाथ खडसे यांचे कट्टर विरोधक गिरीश महाजन यांनी प्रकरणात आणखी किती मुली समोर येतील हे माहिती नाही. याबाबत एसआयटी चौकशीची मागणी केली जात आहे. या प्रकरणाची निःपक्ष चौकशी केली जाईल, असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याने वादाला ठिणगी पडली आहे.
याबाबत बोलताना मंत्री महाजन म्हणाले, प्रथमदर्शनी जे सर्व साहित्य जप्त करण्यात आले होते, ते पोलिसांनी न्यायालयासमोर ठेवले होते. त्यानंतर रूपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटले होते की, चौदाशे फोटो आणि ऑडिओ रेकॉर्डिंग त्यांच्याकडे सापडले आहे. अनेक तरुण मुलींना पिक्चर आणि गाण्यांचे आमिष दाखवून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला. खेवलकरांविरोधात ज्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत. त्याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. या प्रकरणात आणखी किती मुली समोर येतील हे माहिती नाही. याबाबत एसआयटी चौकशीची मागणी केली जात आहे. या प्रकरणाची निःपक्ष चौकशी केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी खेवलकर यांच्या फोनमधील एका गुप्त फोल्डरमधून 252 व्हिडिओ आणि 1497 अश्लील फोटो सापडले आहेत, असा दावा केला होता. त्यानंतर पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात प्रांजल खेवलकर यांच्याविरोधात महिलेच्या संमतीशिवाय फोटो आणि व्हिडिओ काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता यावरून मंत्री गिरीश महाजन यांनी खेवलकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.