आ. रत्नाकर गुट्टेंसह कुटुंबीयांवर सीबीआयकडून गुन्ह्याची नोंद ! ४०९ कोटी रुपयांच्या बँक फसवणुक प्रकरण…!


नवी दिल्ली : सीबीआयने कथित ४०९ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी गंगाखेडचे रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे आणि कुटुंबातील सदस्यांविरोधात एफआयर दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड मतदारसंघातून निवडूण आलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे, त्यांच्या मुलगा आणि कुटुंबातील सदस्यांविरोधात सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. गुट्टे हे गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या संचालकां पैकी एक आहे.

त्यांच्या गंगाखेड शुगर अँड एनर्जी कंपनीने युको बँकेच्या मुदत कर्ज आणि इतर पत सुविधांच्या रूपात ५७७.१६ कोटी रुपयांच्या विविध क्रेडिट सुविधा कर्जाच्या स्वरूपात घेतले. दरम्यान, सीबीआयने ४०९ कोटी रुपयांच्या बँक (Bank) फसवणुकीप्रकरणी सीबीआयने महाराष्ट्राचे आमदार रत्नाकर गुट्टे आणि कुटुंबाविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. याप्रकरणी काल सीबीआयने ५ ठिकाणी छापे टाकले होते. नागपुरातील २ ठिकाणी छापे टाकले होते. तर परभणीच्या तीन ठिकाणी छापे टाकले होते. गुट्टे् यांच्या कंपनीने कथित बँकाची कर्जे मंजूर उद्देशांव्यतिरिक्त इतर कारणांसाठी वापरली गेली असल्याचा आरोप आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!