Ration Shop : महत्वाची बातमी! रेशनच्या दुकानात १ नोव्हेंबर पासून ‘या’ लोकांना मिळणार नाही धान्य, जाणून घ्या…
Ration Shop : सगळ्या योजनांमध्ये जर आपण केंद्र सरकारची गरीब लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली योजना जर बघितलं तर ती म्हणजे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना ही होय. आपल्याला माहित आहे की, या योजनेच्या माध्यमातून भारतातील गरीब व गरजू पात्र लोकांना कमीत कमी दरामध्ये रेशनच्या दुकानातून स्वस्त दरात धान्य पुरवले जाते व आता तर हे धान्य मोफत मिळते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड हे आवश्यक असते. परंतु आता यामध्ये देखील बऱ्याच प्रकारामध्ये काही गैरप्रकारचे घटना समोर येत असल्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आलेली आहेत व यानुसार काही व्यक्तींचे रेशन एक नोव्हेंबर पासून बंद होऊ शकणार आहे.
ई केवायसी करा नाहीतर रेशन विसरा…
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना अंतर्गत शिधापत्रिकेच्या माध्यमातून मोफत किंवा स्वस्त दरात धान्याचा लाभ मिळणाऱ्या सर्व रेशन कार्डधारकांनी ई केवायसी करणे आता खूप गरजेचे आहे व याबाबतची माहिती अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वी जारी केलेली होती. परंतु अजून देखील बऱ्याच रेशन कार्डधारकांनी त्यांची ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.
त्यामुळे अशा रेशन कार्ड धारकांचे एक नोव्हेंबर पासून रेशन बंद होणार आहे. त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार रेशन कार्डधारकांनी ३१ ऑक्टोबर पर्यंत ई केवायसी करून घेणे गरजेचे आहे.
म्हणजेच ३१ ऑक्टोबर पर्यंत जर रेशन कार्ड धारकाने इ केवायसीची प्रक्रिया केली नाही तर त्याला पुढच्या महिन्यापासून रेशनचा लाभ देण्यात येणार नाही. महत्वाचे म्हणजे इ केवायसी न केलेल्या रेशन कार्डधारकांची नावे त्यांच्या रेशन कार्ड मधून वगळण्यात येणार आहेत.