Ratan Tata : अमेरीकन कार उत्पादन कंपनीने रतन टाटांना कसा दिला होता अपमानास्पद सल्ला, मग टाटा यांनी कशी केली परतफेड, राजू शेट्टींनी शेअर केला किस्सा..


Ratan Tata : “रतन टाटा हे देशाला लाभलेले अनमोल रत्न. देशावर त्यांचं खूप प्रेम होतं . यामुळेच 1998 साली त्यांनी देशाच्या नावावर इंडिका या नावाने बाजारात कार आणली . पण ही कार भारतीय बाजारात फारशी चमक दाखवू शकली नाही . आणि टाटांना बऱ्याच सहकार्यानी हा विभाग बंद करण्याचा सल्ला दिला किंवा विकण्याचा सल्ला दिला. टाटांना ही तो सल्ला पटला आणि त्यांनी तो विकण्याचा निर्णय घेतला. ते अमेरिकेतील फोर्ड कंपनीस भेटण्यासाठी गेले.

तीन तास गहन चर्चा झाल्यानंतर . फोर्ड कडून असं सांगण्यात आलं. “जर तुम्हाला कार मधलं काही कळत नसेल तर अशी कंपनी सुरूच कशाला करायची. ही कंपनी जर आम्ही विकत घेतली तर हे तुमच्यावर खूप मोठे उपकार असतील.” हे ऐकल्यानंतर टाटांना खूप अपमानास्पद वाटलं. त्यांनी एक कार प्रोडक्शन विभाग खूप मेहनतीने आणि लक्षपूर्वक चालवण्याचा निर्णय घेतला.

2008 साली अमेरिकेमध्ये मोठी मंदीची लाट आली. यावेळी फोर्ड कंपनी दिवाळखोरीत निघाली. रतन टाटांना ही गोष्ट कळताच ते फोर्ड कंपनीकडे गेले आणि त्यांनी त्यांची जगप्रसिद्ध ‘जैगवार’ कारची जे एल आर कंपनी विकत घेतली. यावेळी मात्र फोर्ड कंपनीकडून रतन टाटांचे कौतुक झालं. Ratan Tata

“रतन टाटांनी आमची कंपनी विकत घेऊन आमच्यावर फार उपकार केले.” अशी प्रतिक्रिया दिली. या प्रसंगावरून रतन टाटांचा शांत स्वभाव आणि त्यांची दिलदार वृत्ती प्रकर्षाने जाणवली. आजही ते देशासाठी गुणवत्ता पूर्ण उत्पादने तयार करण्यात अग्रेसर होते. टाटा म्हणजे गुणवत्ता हे समीकरण त्यांनी बाजारात रुजवलं. या महत्त्वाकांक्षी आणि देशभक्त उद्योगपतीला भावपूर्ण श्रद्धांजली

-राजू शेट्टी(माजी खासदार)

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!