राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव सिद्धिविनायकाच्या चरणी…
मुंबई : मुंबई मध्ये सुरू असलेल्या INDIA MEET बैठकीच्या पुर्व संध्येला राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष,बिहारचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांनी आपले सुपूत्र व बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या समवेत श्री सिद्धिविनायक गणपतीचे मनोभावे पुजन केले व गणपती बाप्पाचे आशिर्वाद घेतले.
या वेळी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे विश्वस्त मा.श्री.राजाराम देशमुख यांनी लालू प्रसाद यादव व तेजस्वी यादव यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले. श्री सिद्धिविनायकाच्या चरणी नतमस्तक होत लालू प्रसाद यादव यांनी देशात सौहार्द, शांती व प्रगतीसाठी बाप्पाकडे प्रार्थना केली.
बाप्पाच्या दर्शनानंतर राजाराम देशमुख यांनी लालू प्रसाद यादव व तेजस्वी यादव यांचा शाल,पुष्पगुच्छ व श्री सिद्धिविनायक गणपतीची मुर्ती देत सत्कार केला.
तसेच श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या वतीने सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच आरोग्य क्षेत्रात केल्या जात असणारया कार्या संदर्भात लालू प्रसाद यादव व तेजस्वी यादव यांच्याशी संवाद साधला.