Rashmi Shukla : विधानसभेच्या निकालानंतर मोठा फेरबदल, रश्मी शुक्ला यांची पुन्हा एकदा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती…

Rashmi Shukla : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरु असतानाच राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने तीन आठवड्यांपूर्वी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरुन बदली केली होती.
यानंतर राज्याच्या पोलीस महासंचालकपदी वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय वर्मा यांची नियुक्ती केली होती. यानंतर आता राज्याच्या विधानसभा निवडणुका संपताच पुन्हा एकदा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.
यासंदर्भात गृह विभागाकडून फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी रश्मी शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. त्यानंतर ५ नोव्हेंबर रोजी महासंचालक पदी संजय कुमार वर्मा यांना पदभार देण्यात आला होता. Rashmi Shukla
आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याने पुन्हा रश्मी शुक्ला यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा पदभार देण्यात आला आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे.