Rashmi Shukla : रश्मी शुक्ला राज्याच्या पोलीस महासंचालकपदी, कारण…


Rashmi Shukla : राज्याच्या पोलीस महासंचालकपदी १९८८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने आता त्यांच्या जागी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या डीजीपीपदी नियुक्ती झाली आहे.

फोन टॅपिंग प्रकरणात त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. त्यानंतर त्यांना सरकारने क्लीन चिट दिली होती. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधीच त्यांची पोलिस प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्याने चर्चा सुरू आहे.

तसेच देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना विरोधी नेत्यांचे फोन कॉल्स बेकायदेशीरपणे रेकॉर्ड करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. या फोन टॅपिंग प्रकरणाची जबाबदारी राज्य गुप्तचर विभाग प्रमुख या नात्याने रश्मी शुक्ला यांच्यावर दोन एफआयआर नोंदवण्यात आले होते.

यांपैकी एक एफआयआर पुण्यात तर दुसरा मुंबईतील कुलाबा पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला होता.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना हे दोन्ही एफआयआर नोंदवण्यात आले होते. हे दोन्ही एफआयआर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार नोंदवण्यात आले होते. Rashmi Shukla

पुण्यात काँग्रेस नेते नाना पटोले तर मुंबईत संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे फोन रेकॉर्ड करण्यात आले होते. दरम्यान, पुणे फोन टॅपिंग प्रकरणात फिर्यादीद्वारे क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला होता. तर दुसरीकडे कुलाबा प्रकरणी शुक्ला यांच्यावर खटला चालवण्यास राज्य सरकारने मंजुरी देण्यास नकार दिला होता.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!