देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ; आरोग्य मंत्र्यांची शुक्रवारी बैठक…!


नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णसंख्येचा वेग झपाट्याने वाढत आहे. गेल्या दोन दिवसांत कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये सुमारे ८० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या दोन दिवसात २३०० हून अधिक कोविड रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी बैठक बोलावली. आरोग्य मंत्री मनसुख मांडविया शुक्रवारी (७ एप्रिल) सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. ही बैठक व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. या बैठकीत विविध राज्यातील कोरोनाबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.

 

 

 

 

 

 

 

आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, गेल्या २४ तासांत देशात कोरोना विषाणूचे ५ हजार ३३५ नवीन रुग्ण आढळले आहेत, तर कोरोनाच्या सक्रिय रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. सक्रिय रुग्ण आता २५ हजार ५८७ पर्यंत वाढले आहेत. प्रदीर्घ काळानंतर देशात एकाच दिवसात पाच हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. काल म्हणजेच बुधवारी (५ एप्रिल) देशात ४ हजार ४३५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!