Ramoji Rao : देशात सर्वात मोठी फिल्म सिटी उभी केलेला अलवीया काळाच्या पडद्याआड, रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन..

Ramoji Rao : सिनेइंडस्ट्रीतून एक दुख:द बातमी समोर आली आहे. आज ८ जून २०२४ रोजी रामोजी ग्रुपचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन झाले. रामोजी राव यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. त्यांना हैदराबाद येथील स्टार रुग्णालयात ५ जून रोजी दाखल करण्यात आले होते. आज ते काळाच्या पडद्याआड गेले आहेत.

१६ नोव्हेंबर १९३६ या दिवशी आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील पेडापरुपुडी गावातल्या एका शेतकरी कुटुंबात रामोजी राव यांचा जन्म झाला. रामोजी राव यांनी रामोजी फिल्म सिटी या जगातील सर्वात मोठ्या थीम पार्क आणि फिल्म स्टुडिओची स्थापना केली.
मार्गदर्शी चिट फंड, ईनाडू न्यूजपेपर, ईटीव्ही नेटवर्क, रमादेवी पब्लिक स्कूल, प्रिया फूड्स, कालांजली, उषाकिरण मूव्हीज, मयुरी फिल्म डिस्ट्रिब्युटर्स आणि डॉल्फिन ग्रुप ऑफ हॉटेल्स या रामोजी राव यांच्या मालकीच्या कंपन्या आहेत. Ramoji Rao

रामोजी राव यांच्या निधनानंतर सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जातो आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी रामोजी राव यांचं निधन झालं आहे. त्यांचं पार्थिव हे रामोजी फिल्म सिटी येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येणार आहे. त्या ठिकाणी ते अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात येईल. रामोजी राव यांच्या निधनानंतर हळहळ आणि शोक व्यक्त होतो आहे.