Ramdas Athawale : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधान बदलतील या फक्त अफवा, रामदास आठवले यांनी विरोधकांचा दावा खोडला…


Ramdas Athawale : नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले, तर देशातील संविधान बदलतील, असा आरोप काँग्रेससह विरोधी पक्षांकडून सातत्याने यासंदर्भात करण्यात येत होते. तसेच राजकीय वतुर्ळातही विविध चर्चा सुरू आहे.

तसेच यावर आता केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, भाजप आणि एनडीए सरकार संविधान बदलणार या अफवांवर महाराष्ट्रातील दलित जनेतेने विश्वास ठेवू नये, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.

आठवले म्हणाले की, एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्‌यावर संविधान भवनाच सेंट्रल हॉलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानावर माथा टेकून शपथ घेतली. पंतप्रधानांची संविधानावर खरी श्रद्धा आहे. Ramdas Athawale

त्यामुळे संविधान बदलले जाईल, या निव्वळ अफवा आहेतकाँग्रेस व इंडिया आघाडीने या अफवा पसरविल्या आहेत मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आबेडकर यांचे स्मारक साकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच जागा मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले, सामाजिक न्याय खात्याच्या माध्यमातून दलितांसाठी नवीन योजना आणण्याचा निर्धारही आठवते यांनी यावेळी व्यक्त केला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!