Ram Poem By Abhi Munde : अभि मुंडेची कविता देशभरात व्हायरल, राम मंदिरावर केलेल्या कवितेची रंगली चर्चा…

Ram Poem By Abhi Munde : सध्या आपल्या मधुर कवितांनी देशाला प्रभावित करणारा एक कवी युट्यूबवर लोकप्रिय झाला आहे. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर या कवीने राम नावाची कविता लोकप्रिय होत आहे.
यामु लाखो दर्शकांना भूरळ पाडली आहे. परळीमधील वानटाकळी हे मूळगाव असलेला अभि मुंडे नावाचा हा युवक कवी सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. तो ‘सायको शायर’ या नावानेच चॅनलही चालवतो.
सध्या लवकरच प्रभू श्रीराम जन्मभूमी असलेल्या अयोध्या नगरीमध्ये प्रभू श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. याची जोरदार चर्चा सुरू आहे. यामुळे सध्या यूट्युबवर राम नावाचे एक काव्य प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.
अभि मुंडे यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अंबाजोगाई येथे झाले. तर अभियांत्रिकीचे शिक्षण जळगाव येथे पूर्ण झाले. त्यांनी बी. टेक पदवी प्राप्त केली आहे. Ram Poem By Abhi Munde
हाथ काट कर रख दूंगा, ये नाम समझ आ जाए तो, कितनी दिक्कत होगी पता है, राम समझ आ जाए तो, राम राम तो कह लोगे पर, राम सा दुख भी सहना होगा, पहली चुनौती ये होगी के मर्यादा में रहना होगा, और मर्यादा में रहना मतलब कुछ खास नहीं कर जाना है. बस. बस त्याग को गले लगाना है और अहंकार जलाना है, अशा ओळी या कवितेच्या आहेत.