Ram Mandir Pran Pratishtha : जय श्रीराम!! ५०० वर्षांची प्रतीक्षा संपली! अयोध्येतील भव्य मंदिरात रामलल्ला अखेर विराजमान…

Ram Mandir Pran Pratishtha : श्रीराम भक्तांची प्रतीक्षा अखेर संपली आणि डोळ्यांचे पारणे फेडणारे रामलल्लांचे मनोहारी रुप समोर आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दुपारी अभिजित मुहूर्तावर अयोध्येत श्री रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा विधी संपन्न झाला. यामुळे आज ५०० वर्षांची प्रतीक्षा संपली. डोळ्यावरून पट्टी काढण्यात आल्यानंतर श्री रामलल्लांचे मूखदर्शन सर्वांना घडले.

हा सोहळा देशवासीयांसाठी सर्वात आनंदाचा आणि डोळ्यात साठवून ठेवावा असा आहे. दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी श्री रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा विधी सुरू झाला. त्यानंतर रामलल्लांच्या डोळ्यावरील पट्टी काढण्यात आली.
पंतप्रधान मोदींनी रामलल्लांच्या डोळ्यांत सुवर्णदंडिकेने काजळ लावले आणि त्यांनी रामलल्लाला आरसा दाखवला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल उपस्थित आहेत. Ram Mandir Pran Pratishtha

अयोध्या या ‘न भूतो न भविष्यती’ सोहळ्यासाठी सजली आहे. सोमवारी शहरात ११ लाख दिवे चेतविले जाणार आहेत. शहर अडीच हजार क्विंटल फुलांनी सजविण्यात आले आहे. सर्वत्र सुरक्षा व्यवस्था चोख आहे. अयोध्येत तब्बल २५ हजारांवर जवान तैनात आहेत. रविवारी सकाळी श्री रामलल्लाच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. सायंकाळी शय्याधिवास पार पडला होता.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरसह बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत, विकी कौशल्य, कॅटरिना कैफ, रणबीर कपूर, अलिया भट्ट, अन्नू कपूर, अभिनेता रणदीप हुडा, दाक्षिणात्य अभिनेते रामचरण संगीतकार आदी अयोध्येत दाखल झाले.