Ram Mandir Inauguration : राम मंदिर होणार भव्यदिव्य! मंदिरातील दरवाज्यांना सोन्याचा मुलामा, १०० किलो सोनं वापरणार..


Ram Mandir Inauguration :अयोध्येतील रामलल्लांच्या मंदिरात सोन्याचा मुलामा दिलेले १८ दरवाजे बसविण्यात येणार आहेत. यातील १८ दरवाजांना दिल्लीतील कारागिरांनी १०० किलो सोन्याचा मुलामा दिला आहे. सोन्याचा दरवाजा १२ फूट उंच आणि 8 फूट रुंद असणार आहे.

विशेष म्हणजे महाराष्ट्रातून नेण्यात आलेल्या सागवानी लाकडांचा राम मंदिरातील दरवाजांसाठी वापर करण्यात आला आहे. राम मंदिरात एकूण ४६ दरवाजे असणार आहेत.

सागवानासाठी बनविण्यात आलेले दरवाजे १००० वर्ष टिकणार आहेत. दरवाजांवर नक्षीकाम करण्यात आले असून यावर विष्णू कमल, वैभवाचे प्रतीक गज, देवी आदींची चित्रे पाहावयास मिळणार आहेत. Ram Mandir Inauguration

दरम्यान, राम मंदिराच्या समारंभाची जोरदार तयारी सुरू आहे. अनेकांना याबाबत निमंत्रण दिले आहे. यामुळे अनेक बडे नेते याठिकाणी उपस्थित राहणार आहेत. याची चोख व्यवस्था देखील ठेवण्यात आली आहे.

हा सोहळा मोठा भव्यदिव्य होणार आहे. यासाठी जगभरातून अनेकजण उपस्थित राहणार आहेत. अनेकांना याच्या निमंत्रण पत्रिका दिल्या जात आहेत. यासाठी आता काही दिवसच उरले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!