Raksha Bandhan 2023 : भावाच्या उन्नतीसाठी रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने अवश्य करावे ‘हे’ उपाय, जाणून घ्या…


Raksha Bandhan 2023 पुणे : रक्षाबंधनाचा सण यावेळी दोन दिवस म्हणजे ३० आणि ३१ ऑगस्टला साजरा होणार आहे. ३० ऑगस्टला भद्रा छायेमुळे राखी बांधणे शुभ नाही आणि बांधायची झाल्यास रात्री ९ वाजतानंतर बांधता येईल. राखीचा सण ३१ ऑगस्टला पहाटे साजरा केल्यास उत्तम होईल.

यावेळी रक्षाबंधनाच्या दिवशी ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती विशेष असणार आहे. या दिवशी काही उपाय केल्यास खूप शुभफळ प्राप्त होतात. आपल्या भावांच्या प्रगतीसाठी आणि आर्थिक स्थिती बळकट होण्यासाठी बहिणींनी रक्षाबंधनाच्या दिवशी काही उपाय करावेत. यामुळे भाऊ-बहिणीचे नातेही घट्ट होते.

भावा-बहिणीमध्ये मतभेद असल्यास रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने प्रथम गणेशाला राखी अर्पण करावी आणि नंतर भावाला राखी बांधावी. यामुळे भाऊ-बहिणीमधील प्रेम वाढते आणि नाते घट्ट होते. यासोबतच घरात सुख-समृद्धी येते.

भावाच्या आर्थिक स्थितीत प्रगतीसाठी रक्षाबंधनाच्या दिवशी हे उपाय अवश्य करावेत. यासाठी बहिणीने अखंड, सुपारी आणि चांदीचे नाणे गुलाबी कपड्यात ठेवून भावाला द्यावे. भावाने हे नाणे आणि सुपारी तिजोरीत ठेवावे. हा उपाय केल्याने कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

तसेच रक्षाबंधनाच्या दिवशी गरिबांना अन्नदान करा. या दिवशी गाईला हिरवे गवत खायला द्यावे. असे केल्याने कुटुंबात सुख-समृद्धी नांदते. त्याचबरोबर जीवनात आनंद वाढतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!