Raju Shetti : आजपासून साखरेचे एकही पोते कारखान्याबाहेर जाऊ देणार नाही, राजू शेट्टी यांचा इशारा…
Raju Shetti कोल्हापूर : गेल्यावर्षीच्या उसाच्या प्रतिटन ४०० रुपयांसाठी आजपासून साखरेचे एक पोते देखील कारखान्याबाहेर जाऊ देणार नाही. त्याचबरोबर एखादा ट्रक, टेम्पो जर कार्यकर्त्यांनी अडवला तर याला संघटना जबाबदार राहणार नाही असा गंभीर इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. Raju Shetti
शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शेट्टी Raju Shetti म्हणाले की, गेल्या गळीत हंगामातील प्रति टन ४०० रुपये मिळावेत आणि त्याचबरोबर यंदाच्या गळीत हंगामातील दिशा ठरण्यासाठी मंगळवारपासून (ता. १७) कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यावर ‘आत्मक्लेश यात्रा’ काढली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
पुढे ते म्हणाले की, २२ दिवस ही यात्रा काढली जाणार आहे. म्हणजेच १७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर अशी ही यात्रा असणार आहे. यावेळी जयसिंगपूर या ठिकाणी या दिवशी २२ वी ऊस परिषद घेतली जाणार आहे. साखर कारखान्यांना चारशे रुपये देणे शक्य आहे त्यामुळे स्वाभिमानीची मागणी चुकीची नसल्याचे देखील राजू शेट्टी यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
जनाची नाही तर मनाची लाज वाटून कारखानदार ४०० रुपयांचा दुसरा हप्ता देतील. दरम्यान, महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांवर ढोल बजावून त्यांना जाग करण्याचे काम केले आहे.
उद्यापासून उग्र आंदोलन केले जाणार आहे. कारखाने सुरू झाल्यानंतर प्रतिक्विंटल दर ३३०० रुपये होता. सरकारने निश्चित केलेल्या दरापेक्षा कारखान्यांना ५०० रुपये दर मिळाले आहेत. ते शेतकऱ्यांना दिले पाहिजेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.