Rajnath Singh : जहाजांवर हल्ला करणाऱ्यांना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिला थेट इशारा, म्हणाले…


 Rajnath Singh : भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी भारतात येणाऱ्या एका व्यावसायिक जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय नौदलाने समुद्रावर निगराणी वाढवली आहे.

दोन दिवसांपूर्वी अरबी समुद्रात व्यापारी जहाजांवर हल्ला ज्यांनी केला त्यांना आम्ही समुद्रतळातून शोधून काढू आणि त्यांच्यावर कडक कारवाई करू, असे राजनाथ सिंह यांनी स्‍पष्‍ट केले. आज (ता.२६) मुंबईत आयएनएस इंफाळच्या नौदलात दाखल कार्यक्रम सोहळ्यात ते बोलत होते. Rajnath Singh

सध्या दक्षिण समुद्रातील कुरघोड्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. भारताच्या वाढत्या आर्थिक आणि सामरिक सामर्थ्याने काही शक्ती ईर्ष्या आणि द्वेषाने भरल्या आहेत. अरबी समुद्रातील ‘एमव्ही केम प्लुटो’वर नुकताच झालेला ड्रोन हल्ला आणि काही दिवसांपूर्वी लाल समुद्रात ‘एमव्ही साईबाबा’वर झालेला हल्ला भारत सरकारने अत्यंत गांभीर्याने घेतला आहे, असेही मंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.

हिंद महासागरात चीनच्या वाढत्या घुसखोरी दरम्यान भारतीय नौदलाच्या सागरी क्षमतेला चालना देण्यासाठी आज (ता.२६) भारतीय नौदलात INS इंफाळ दाखल झाली आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे आयोजित समारंभात ही युद्धनौका सशस्त्र दलात दाखल करण्यात आली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!