Rajinikanth Birthday : बस कंडक्टर ते तामिळनाडूचा थलायवा, रजनीकांत यांच्या संपत्तीचा आकडा पाहून तुम्हालाही फुटेल घाम…

Rajinikanth Birthday : दक्षिण भारतात ज्यांची देवासारखीच पूजा होते, ज्यांना देवाइतकाच मान मिळतो.. असे सुपरस्टार रजनीकांत यांचा संपूर्ण जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. आज १२ डिसेंबर रोजी त्यांचा ७३ वा वाढिदवस आहे.
त्यांचा जन्म एका सामान्य मराठी कुटुंबात झाला, परंतु आज फक्त भारत नाही तर जगात त्यांचे चाहते आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा ‘जेलर’ हा सिनेमा रिलीज झाला होता. त्याने धमाकेदार कमाई केली आहे.
चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याआधी रजनीकांत हे छोटी-मोठी कामी करून उदरनिर्वाह करायचे. अभिनयात पाऊल ठेवल्यानंतर त्यांना सुरुवातीला फक्त २००० रुपये मानधन मिळालं होतं. करिअरच्या सुरुवातीला त्यांनी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यासोबत काम केले होते.
त्यांनी १९८३ मध्ये आलेल्या ‘अंधा कानून’ या सिनेमामुळे त्यांची वेगळी ओळख तयार झाली. सध्या ते एका चित्रपटासाठी तब्बल 100 कोटी रुपयांपर्यंत मानधन घेतात. जेलर या चित्रपटाठी त्यांनी ११० कोटी रुपये मानधन घेतले होते. Rajinikanth Birthday
रजनीकांत यांनी हिंदी, कन्नड, बंगाली आणि तेलुगू अशा भाषा असणाऱ्या चित्रपटात काम केले आहे. याशिवाय रजनीकांत यांची भारतातील सर्वात जास्त मानधन घेणारे अभिनेते म्हणून ओळख आहे. भारताबाहेरही त्यांचा बोलबाला आहे. जगातील सर्वात जास्त मोठा चाहता वर्ग असणारा अभिनेता म्हणून गिनिज बुकमध्ये त्यांचं नाव आहे.
आता किती आहे संपत्ती..??
रजनीकांत यांची संपत्ती ४३० कोटी रुपये आहे. त्यांना महागड्या गाड्यांची आवड आहे. त्यांच्याकडे ६.५ कोटी रुपये किंमतीची रोल्स रॉयस फँटम आणि ६ कोटी रुपयांची रोल्स रॉयस घोस्ट गाड्या आहे.
शिवाय १.७७ पासून ६७.९० कोटी रुपयांपर्यंत BMW X5, २.५५ कोटी रुपयांची Mercedes Benz G Wagon, Premier Padmini, Toyota Innova, ३.१० कोटी रुपयांची Lamborghini Urus आणि Hindustan Motors Ambassador कार देखील आहेत. चेन्नईच्या आलिशान बंगल्याची किंमत ३५ कोटी रुपये आहे.