Rajendra Tilekar : यशवंत च्या निवडणुकीत टिळेकरवाडी व खामगावटेक गावांनी आण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनेलला दिले मोठे पाठबळ! माजी उपाध्यक्ष राजेंद्र टिळेकर यांचा पॅनेलमागे उभा राहण्याचा निर्णय..!!

Rajendra Tilekar उरुळीकांचन : यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत ‘ब’ वर्ग संस्था गटातून अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनेलचा एक उमेदवाराचा बिनविरोध निवडून येण्याचा श्रीगणेशा झाल्या- नंतर आता पॅनेलला उरुळीकांचन ऊस उत्पादक गटातून दोन गावांनी एकत्र येऊन संपूर्ण ताकदीने पॅनेलला पाठबळ देण्याचा निर्णय घेतल्याने या गटातून आघाडीची घौडदोड मिळविण्याचा दृड विश्वास टिळेकरवाडी व खामगाव टेक ग्रामस्थांनी दिला आहे.
यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या गट क्र एक मधून टिळेकरवाडी व खामगावटेक ग्रामस्थांनी दोन्ही गावातून एकमुखी दोघा उमेदवारांना आण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनेलची उमेदवारी देऊ केली आहे.
दोन्ही गावातील सभासदांनी यशवंतचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली गावातील दोन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. गावातील सभासदांनी एक मुखी पॅनेलच्या पाठिमागे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही दोन्ही गावे संपूर्ण प्रचारात सहभागी होऊन पॅनेलला मताधिक्य देण्याचा विश्वास राजेंद्र टिळेकर यांनी दिला आहे. Rajendra Tilekar
टिळेकरवाडी व खामगाटेक ही प्रत्येक निवडणुकीत एक वेगळा पॅटर्न राबविताना तालुक्यात दिसली आहे. विकासकामे असू की सार्वजनिक हिताची कामे ग्रामस्थ या निर्णय प्रक्रियेत एकदिलाने उतरून एकीची वज्रमूठ दाखवित आहे. एकाचे काम हाती घेतले की प्रामाणिकपणे निभवायचे असी भूमिका प्रत्येक निवडणुकीत या ठिकाणी दिसून आली आहे. त्यामुळे कारखाना निवडणुकीत या गावांनी आण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनेल मध्ये दोन उमेदवार देऊन आपला पाठिंबा व्यक्त केला आहे.
उरुळीकांचन ऊस उत्पादक गटातून अजिंक्य महादेव कांचन, अमित भाऊसाहेब कांचन, विकास विलास आतकिरे, इतर मागासवर्गीय गटातून रोहिदास टिळेकर, भटक्या जाती / जमाती प्रतिनिधी गटातून मारुती थोरात यांचा प्रचार गावकरी सामुहिकपणे करीत आहेत.
आण्णासाहेब मगर रयत पॅनेलचे प्रमुख माधवराव काळभोर, बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन, उमेदवार राजीव पाटील घुले आदींनी केलेल्या कारखान्याची जमीन एक गुंठा न विकता कारखाना सुरू करण्याचा प्रयत्नांना सहभागी होण्याचा निर्णयाने टिळेकरवाडी व खामगाटेकच्या ऊस उत्पादकांनी पॅनेलच्या पाठिमागे राहण्याचा निर्णय गावकऱ्यांनी बैठक घेऊन केली आहे.