Rajan Salvi : मोठी बातमी! ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यावर गुन्हा दाखल, प्रकरण काय?


Rajan Salvi : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या अडचणीत आणखीच वाढ झाली आहे.

कारण, आमदार राजन साळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. Rajan Salvi

रत्नागिरी एसीबी कार्यालयातून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. उत्पन्नापेक्षा 118% संपत्ती जास्त असल्याचा आरोप साळवी यांच्यावर करण्यात आला आहे.

पोलीस एफआयआरमध्ये आरोपी म्हणून स्वतः राजन साळवी, त्यांची पत्नी आणि मुलाचा समावेश असल्याची माहिती आहे. राजन साळवी यांची मूळ संपत्ती २ कोटी ९२ लाख अंदाजे असून त्यांनी ३ कोटी ५३ लाखांची अपसंपदा जमा केल्याचा एसीबीचा आरोप आहे.

दरम्यान, मागच्या दीड वर्षापासून राजन साळवी यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची याप्रकरणी चौकशी सुरू आहे. याच मालमत्तेची चौकशी करण्याकरता आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आमदार राजन साळवी यांच्या घरावर पुन्हा एकदा छापा मारला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!