राज ठाकरें विरोधातील अटक वॉरंट रद्द! कोर्टाकडून 500 रुपयांचा दंड…!

बीड : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधातील अटक वॉरंट रद्द झाले आहे. परळी न्यायालयाने राज ठाकरेंचे अटक वॉरंट रद्द केले आहे. परळी न्यायालयाने 500 रुपयाचा दंड ठोठावत राज ठाकरेंची अटक वॉरंट रद्द केले आहे.

सकाळी 11 वाजता राज ठाकरे कोर्टात हजर झाले. त्यानंतर राज ठाकरे यांच्या वकिलाने कोरोना काळ आणि लिलावती रुग्णालयात दाखल असल्यामुळे राज ठाकरे कोर्टात हजर राहू शकले नव्हते. मात्र, आज ते हजर झाले असून त्यांचे अटक वॉरंट रद्द करण्यात यावे असा युक्तिवाद केला होता.
परळी कोर्टाने या युक्तिवाद मान्य करत राज ठाकरे यांचे अटक वॉरंट रद्द करत 500 रुपयांचा दंड ठोठावला. तसेच, या प्रकरणावर येत्या 23 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.

या सुनावणीसाठी पुणे, मुंबई, परळीतील वकिलांची टीम राज ठाकरे यांच्यासाठी उभी होती. राज ठाकरे कोर्टासमोर पाच मिनिट उभे होते. त्यांना 500 रुपये दंड करताना त्यांचा अटक वॉरंट रद्द केला. परळी शहरातील कोर्ट परिसरात राज ठाकरे दाखल झाल्यानंतर कोट परिसरामध्ये मोठी गर्दी झाली होती.