Raj Thackeray : मनसेचा गुढीपाडवा मेळावा! राज ठाकरेही भाजपसोबत जाणार का? आजच होणार निर्णय…

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भव्य गुढीपाडवा मेळावा आज पार पडणार आहे. शिवाजी पार्कात होणाऱ्या या गुढीपाडवा मेळाव्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. आज गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेले अनेक दिवस मनसे आणि भाजप युतीच्या चर्चांना वेग आला होता. आजच्या मेळाव्यात राज ठाकरे मनसे-भाजप युतीची घोषणा करणार का याकडे राज्याचं लक्ष लागले आहे. तसेच मनसेने गुढीपाडवा मेळाव्याचा टीझर काही दिवसांपूर्वी लाँच केला होता. आता सांगण्याची वेळ आली आहे, असं या टीझरमध्ये राज ठाकरे यांनी म्हंटले होते.
मनसेने गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आवाजातील एक व्हिडीओ टीझर शेअर केला होता. गेल्या काही दिवसात आपल्या पक्षाबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

याकडे मी शांतपणे बघत होतो. पण आता या सगळ्यावर बोलण्याची वेळ आली आहे. नक्की काय घडतंय, काय घडवलं जातंय, हे सांगण्याची वेळ आली आहे, असं राज ठाकरे यांनी या टीझर व्हिडीओमध्ये म्हंटले आहे. Raj Thackeray
दरम्यान, गेले काही दिवसात भाजप-मनसे युतीच्या हालचालींना वेग आल्याचे बोलले जात आहे. मनसे आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याचं दिसून आलं. त्यातच राज ठाकरे यांच्या दिल्लीवारीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती.
यानंतर भाजप आणि मनसे युतीच्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवल्यात येत होती. मात्र, अद्यापही याबाबत कोणतीही घोषणा नाही, त्यामुळे आजच्या मेळाव्यात राज ठाकरे कोणती घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.