Raj Thackeray : उद्या पुण्यात राज ठाकरेंची सभा, महायुतीला दिलेल्या पाठिंब्यानंतर पुण्यात काय बोलणार?
Raj Thackeray : सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तोफ पुण्यात धडाडणार आहे. यामुळे या सभेत ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सारसबाग परिसरात सायंकाळी 6 वाजता ही सभा होणार आहे. राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यानंतर त्यांची ही दुसरी सभा असणार आहे. आधी नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सभा झाल्यानंतर उद्या पुण्यामध्ये सभा होणार आहे. यावेळी ते कोणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याबाबत एक बैठक झाली. यामध्ये बैठकीत राज ठाकरे यांच्या सभेचे योग्य पद्धतीने नियोजन करण्यात येणार आहे. याबाबत मनसेचे नेते
बाळा नांदगावकर यांनी माहिती दिली.
ते म्हणाले की, पुणेकर मतदार युवक राज ठाकरे यांचे विचार ऐकण्यास उत्सुक असतो. मनसेला मानणारा मोठा मतदार पुणे लोकसभा मतदारसंघात आहे. Raj Thackeray
मनसेचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोहोळ यांच्या प्रचारात एकदिलाने उतरले आहेत. ही सभा यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्व जण काम करत आहोत. सभेला चांगली गर्दी होईल असा विश्वास आहे. सभास्थानी प्रत्यक्ष जाऊन पाहाणी केली आणि आढावा घेतला.
दरम्यान, या सभेला कोण कोण उपस्थित राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुण्यात वसंत मोरे हे राज ठाकरे यांना सोडून गेल्याने आता राज ठाकरे यांच्यासोबत कोण कोण आहे, हे यावरून स्पष्ठ होणार आहे. यामुळे सभेकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.