Raj Thackeray : राज ठाकरेंचा उद्धव-शरद पवारांना इशारा, म्हणाले, माझ्या नादी लागू नका, नाहीतर…


Raj Thackeray उद्धव ठाकरे व शरद पवार मनोज जरांगे यांच्या आडून राजकरण करत आहेत. माझ्या नादाला लागू नका, अन्यथा विधानसभा निवडणुकीत तुम्हाला एकही सभा घेऊ देणार नाही, असा थेट इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गटाला दिला आहे.

आताच सांगतो माझ्या वाटेला जाऊ नका, नाहीतर सभाही घेता येणार नाही, माझी पोर काय करतील हे सांगता येत नाही असे म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे, शरद पवारांना इशारा दिला आहे. ते मराठवाड्यात माध्यामांशी बोलत होते.

महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्यात आरक्षणाची गरजच नाही या भूमिकेचा पुनरूच्चार राज ठाकरेंनी केलाय. आपल्या दौऱ्याचा जरांगे पाटलांशी काहीही संबंध नव्हता, मात्र आपल्याविरोधात जाणीवपूर्वक प्रचार करण्यात आला असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे.

राज ठाकरे म्हणाले, माझा आणि मनोज जरांगेचा संबंध नाही. पण उद्धव ठाकरे आणि शरद पवार जरांगेच्या अडून राजकारण करत आहेत. जरांगे पाटलांच्या अडून विधानसभेचे राजकारण सुरू आहे.

तुमचे राजकारण तुम्हाला लखलाभ… माझ्या नादी लागू नका… माझी पोर काय करतील हे सांगता येत नाही. उद्या माझे मोहळ उठले तर एकही सभा घेता येणार नाही. माझ्या वाट्याला जाऊ नका. तुमच्याकडे प्रस्थापित आहेत माझ्याकडे विस्थापीत आहेत.

आरक्षणासंदर्भात माझी भूमिका पहिल्यापासून एकच आहे. मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही आरक्षण द्यायचे असेल तर आर्थिक निकषांवर द्यावे… महाराष्ट्राला आरक्षण देण्याची गरज नाही.. महाराष्ट्रात अनेक उद्योगधंदे आहेत.. अनेक नोकऱ्या आहेत नोट वापरले तर पुरून उरेल एवढ्या नोकऱ्या आहेत. Raj Thackeray

त्या बाहेरील लोकांना देण्यापेक्षा मराठी मुलांना द्यावात. आर्थिकदृष्ट्या जो मागास आहेत त्याला आरक्षण दिले जाते. जातीवर राजकारण केले जाते. मनोज जरांगेचा माझा संबंध नाही. पण उद्धव ठाकरे आणि शरद पवार राजकारण करत आहेत, असे राज ठाकरे म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!