सर्वात मोठी बातमी!! उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर, चर्चांना उधाण…

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावर होत असताना एक नवी घडामोड समोर आली.
वसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झाले. मागील काही महिन्यांपासून उद्धव आणि राज ठाकरे हे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. मराठी मेळाव्यात दोन्ही बंधू एकत्र आले होते.
त्यानंतर आज राज यांनी मातोश्री गाठले. त्यामुळे आता राज्यात नव्या समीकरणाची शक्यता बळावली आहे. राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर अनेक वर्षांनी आज मातोश्री या निवासस्थानी दाखल झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
मराठी विजय मिळाव्याच्या निमित्ताने काही दिवसांपूर्वी राज आणि उद्धव ठाकरे हे तब्बल १९ वर्षांनंतर एका व्यासपीठावर आले होते. त्यानंतर आता वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर गेल्याने ठाकरे बंधूंच्या मनोमिनलाची प्रक्रिया आणखी पुढे सरकल्याचं दिसत आहे.
जवळपास २० वर्षानंतर राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झाले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झाले नव्हते. त्यानंतर आज उद्धव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मातोश्रीवर पोहचले आहेत.
राज ठाकरे यांच्यासोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, नितीन सरदेसाई आदी नेतेदेखील उपस्थित होते. तर, शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, अंबादास दानवे, भास्कर जाधव, वैभव नाईक आदी उपस्थित होते.