Raj Thackeray : आज कारसेवकांचे आत्मे सुखावले अन् शरयू नदी हसली, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर राज ठाकरे यांची भावना…

Raj Thackeray : अयोध्येत श्री राम मंदिरात रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा पार पडली.

यानंतर देशभरात उत्सहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘आज कारसेवकांचे आत्मे सुखावले, आणि शरयू नदी हसली!’ असे ते म्हंटले आहे.


अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची अनेक वर्षांपासून वाट पाहिली जात होती. या सोहळ्यासाठी मोठअया प्रमाणात तयारी देखील करण्यात आली. देश-विदेशातील मान्यवरांना निमंत्रणे पाठवण्यात आले होते. अखेर आज हा सोहळा पार पडला आहे. Raj Thackeray
यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि ३२ वर्षांनी शरयू नदी हसली! जय श्रीराम!” अशी पोस्ट मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये केली आहे. सोबत रामलल्लांच्या मूर्तीची एक व्हिडीओ क्लीप देखील राज ठाकरे यांनी शेअर केली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मंदिरात आगमन झाल्यानंतर शंखनाद करण्यात आला. सनई चौघडे वाजवण्यात आले. यानंतर सभामंडपातून पंतप्रधान मोदी मंदिराच्या गाभाऱ्यात आले. यावेळी पंतप्रधानांनी रामलल्लांची विधीवत पूजा केली. ५०० वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर राम मंदिरात रामल्लांची मूर्ती विराजमान झाली.
