अजित पवारांच्या अपघातावर राज ठाकरे यांना वेगळाच संशय, म्हणाले अपघात धोक्याने…! केलं मोठं वक्तव्य

मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सध्या आमदार रोहित पवार आक्रमक झाले असून तपास करण्यासाठी रोज मागणी करत आहेत. त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना याबाबत सगळी माहिती दिली. यानंतर राज ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, अजित पवारांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर, त्या घटनेबद्दल अनेक शंका-कुशंका व्यक्त होत आहेत.

याबाबत आमदार रोहित पवार हे पोलीस स्थानकांत तक्रार नोंदवून घ्यायला गेलेले असताना, त्यांची तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला गेला. पोलिसांवर एफआयआर नोंदवून न घेण्यासाठी सरकारकडूनच दबाव आणला गेला असं दिसतंय. एफआयआर नोंदवून न घेण्यासाठी सरकार दबाव का टाकतंय? असेही ते म्हणाले.
तसेच एफआयआर नोंदवून घेतलाच पाहिजे असे सक्त निर्देश असताना जर एका आमदाराची तक्रार नोंदवून घेतली जात नसेल तर मग सामान्य माणसांचं काय होत असेल ? अजित पवारांच्या बाबतीत जे घडलं ते अतिशय दुर्दैवी आहे, अशा घटनेनंतर जर त्यांच्या घरच्यांच्या मनात काही शंका असेल आणि त्यांनी याचा तपास व्हावा.

याबाबत मागणी पोलिसांकडे केली आणि त्यावर सरकार अजित पवारांसारख्या नेत्याच्या बाबतीत सुद्धा, पोलिसांनी साधा एफआयआर नोंदवून घेऊ नये यासाठी दबाव टाकत असेल तर यात नक्की काय काळंबेरं आहे हे जनतेला कळलंच पाहिजे. असेही राज ठाकरे यांनी सांगितले आहे. यामुळे सरकार नेमकं काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.