पावसाचे तुफान! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातील शाळा बंद, अकरावी प्रवेशाबाबतही मोठा निर्णय…


पुणे : २४ तासांपासून मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. सोमवारी बरसलेल्या तुफान पावसाने मुंबईकरांची अक्षरश: दाणादाण उडाली. आजही मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.

लाखो हेक्टरवरील शेती पाण्याखाली गेली असून, मुंबई व उपनगरातील रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. लोकल गाड्याही उशिराने धावत आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, हवामान खात्याने मुंबई व आसपासच्या भागाला रेड अलर्ट दिला असून पुढील १२ ते ४८ तास मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांचा प्रवास धोकादायक होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे.

तसेच राज्यात विविध ठिकाणी होत असलेल्या जोरदार पावसामुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे अकरावीला प्रवेश घेणान्या विद्यार्थयाची होणारी गैरसोय टाळण्यासाठी शिक्षण संचालनालयाने विद्यर्थयाना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश् घेण्याठी दोन दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार ११ ते २० ऑगस्टपर्यत असलेली मुदत २२ ऑगस्टपर्यत वाढविण्यात आली आहे.

ठाणे महानगरपालिका हद्दीत सर्व शाळा बंद राहणार आहेत. कल्याण-डोंबिवलीतील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. मीरा-भाईंदर पालिका क्षेत्रातील शाळांनाही सुट्टी जाहीर झाली आहे.

मुंबई महापालिका परिक्षेत्रातील खासगी, विनाअनुदानित, अनुदानित अशा सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा १९ ऑगस्ट रोजी बंद राहतील. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हवामान खात्याच्या सूचनांनुसार शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जाईल असे म्हटले होते. त्यानुसार पावसाचा धोका पाहून संबंधित जिल्ह्यांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!