दिल्लीत जोरदार वाऱ्यावर पावसाला सुरुवात, वाढलेल्या तापमानापासून मोठा दिलासा…
नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली-एनसीआरमधील लोक उष्णतेमुळे हैराण झाले होते. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील अनेक भागात पारा ४५ च्या वर आहे. यामुळे अनेकजण हैराण झाले होते. असे असताना आता त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दिल्लीत एनसीआरमध्ये सध्या पाऊस पडत आहे. विजा चमकत आहेत आणि त्याच वेळी जोरदार वारेही वाहत आहेत. ढगांचा गडगडाट आणि गडद ढगांमुळे रस्त्यांवरील दृश्यमानताही कमी आहे.
आजच्या पावसाने हवामान बदलले आहे. त्यामुळे तापमानात लक्षणीय घट होण्याचा अंदाज आहे. पुढील काही दिवस अधूनमधून पाऊस आणि ढगांचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्यामुळे मे महिन्याचे उर्वरित पाच दिवस आनंददायी असतील. यामुळे येणाऱ्या काळात दिल्लीकरांना दिलासा मिळू शकतो. दिल्ली विमानतळाने प्रवाशांना त्यांच्या फ्लाइटशी संबंधित माहिती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.