Rain Update : राज्यात पुन्हा एकदा पाऊस हजरी लावणार, ‘या’ तारखेपर्यंत फक्त धो-धो, काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा धोका…


Rain Update : राज्यात पुन्हा एकदा पावसाने हजरी लावली आहे. अशातच आता हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक नवीन अंदाज दिला आहे. या नवीन अंदाजानुसार महाराष्ट्रात आगामी काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.

विजा, वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस बरसणार असा अंदाज त्यांनी दिला आहे. यामुळे काही भागात पूरस्थिती तयार होईल आणि सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

सोबतच या जास्तीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचेही नुकसान होण्याची भीती आहे. खरे तर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने विश्रांती घेतली. यामुळे सप्टेंबरमध्ये पाऊसमान कसे राहणार याबाबत प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र सप्टेंबर मध्ये पावसाने जोरदार कमबॅक केला आहे.

तसेच काही ठिकाणी ३१ ऑगस्ट पासूनच पाऊस सुरू झाला आहे. ३१ ऑगस्ट पासून मराठवाड्या कडन पावसाला सुरुवात झाली आहे. ३१ ऑगस्ट च्या मध्यरात्री राज्यातील मराठवाडा विभागातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. Rain Update

तसेच काल एक सप्टेंबरला राज्यातील मराठवाडा विभागात एवढा मुसळधार पाऊस झाला आहे की अनेक नद्यांना पूर देखील आला आहे. दरम्यान, पंजाब रावांनी ५ सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रात असेच हवामान कायम राहणार असा अंदाज दिला आहे.

दरम्यान, पंजाबराव यांनी सांगितल्याप्रमाणे, या काळात राज्यभर पाऊस पडणार आहे. राज्यातील यवतमाळ, नांदेड, अकोला, बुलढाणा, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद, पंढरपूर, अहमदनगर, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजी नगर या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

तसेच यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, बीड, नगर, संभाजी नगर, सोलापूर, नाशिक, मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव या १३ -१४ जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!