Rain Update : पुढील दोन दिवस महत्वाचे!! राज्यात जोरदार पाऊस पडणार, हवामान खात्याचा इशारा…


Rain Update : राज्यात जून महिन्यात काहीशी विश्रांती घेतलेला पाऊस जुलै महिन्यात सक्रीय झाला आहे. राज्यात पुढील दोन दिवस जोरदार पाऊस बसरणार आहे, अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

हवामान विभागाने उद्या शुक्रवारी (ता.५) विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे. तसेच कोकणामध्ये काही भागात जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

सेच विदर्भातील वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यालाही येलो अलर्टचा इशारा आहे. मराठवड्यात मात्र हलक्या पावसाचा अंदाज आहे. राज्यात पुढील तीन-चार दिवस पावसासाठी पोषक हवामान असून पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

येलो अलर्ट जारी…

दरम्यान, शनिवारी आणि रविवारी संपूर्ण विदर्भामध्ये काही भागात जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून, कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे येथे जोरदार पाऊस होईल.

तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे आणि सातारा, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली तर खानदेशातील जळगाव आणि धुळे जिल्ह्यालाही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!