Rain Update : महाराष्ट्रासाठी धोक्याचा इशारा! राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या…

Rain Update : राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. यावेळी पावसाचा जोर हा विदर्भात अधिक असणार आहे. विदर्भातील गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकणातील तुरळ जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

हवामान विभागाकडून मुंबई आणि उपनगरात पुढील २४ तासांसाठी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे, या काळात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
कोकणात देखील हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे, हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. असे हवामान विभागानं म्हटलं आहे. Rain Update

उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हंटले आहे.